Skip to main content

Posts

मनाच्या उसाहाच्या लाटांमधे एखादी लाट अचानक येते... अन् संपूर्ण समुद्र शांत करून जाते...माझ्याच नकळत...
Recent posts
घेशील का रे तुझ्या पाडसाला एकच रात्र कुशीत सत्यात कधी ते माहित नाही पण स्वपनात तरी येशील स्वपनांचच तर जग आहे त्याच.. तू सुद्धा कोवळया पहाटे पडलेले एक सुंदर स्वप्न!!
कुठेतरी दूर.... किना-र्यावर जायचं हळूच येणार्‍या लाटा पावालांवर घेत लाटानच संगीत कानात आणि मनात साठवत थंडगार वारा अंगावर घेत क्षितिजाच्या पलीकडे पहात एक सोबत ठेवायाची मनात आणि हात कल्पनेतल्या हातात एका शब्दची पण गरज नाही भासणार तुला वाटेल की सर्व जवळ आहे शांत, सुंदर, आणि खूप मनापासून प्रेम करणारं कोणी..
कधी डोळयात प्रेम दाटून आलं तर ते अडवुन ठेवायाचं नाही गालावर ओघळु देतांना... ते आपल्या ओठांवर सजवायला.. राधा येणार हे विसरायच नाही!
इवल्याश्या थेंबानी येउन तो मला खुप हसवतो, कदाचित शिकवतो.. भरून आलं की रडायचं नसतं, माझा सारखं बरसुन हसवायचं असतं! :)
राधा.. दूर आकाशातली एक सुंदर चांदणी, सागराची एक शांत लाट कधी अचानक आलेल वादळ, असंख्य हळवे श्वास, अगणित शब्द अन् मुक भावना, निरागस हसू अन् अथांग डोळे, प्रेमाचे मुक्त तुषार!!
कधी भावना इतक्या अबोल होतात की.. माझाशी पण बोलत नहीं हृदयातच बंद रहातात, डोळ्यावाटे पण बाहेर येत नहीं!